रत्नागिरीत अनेक गृहप्रकल्प तयार होत असतात , अनेक परिवार आपल्या वास्तु ची स्वप्न बिल्डर्सच्या माध्यमातून पूर्ण करत असतात ,बिल्डर्स वास्तु बांधून देत असतात आणि सदर वास्तु ग्राहकांच्या ताब्यात देत असतात, तसं बघितले तर हा क्षण ग्राहकांच्या स्वप्नपूर्तीचा म्हणजेच आनंदाचा क्षण असतो म्हणूनच कौमुदी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तसेच निर्माण रिअल्टर्स ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक गृह प्रकल्पाचा एक छानसा हस्तांतरण सोहळा आयोजित करत असतात ,जो रत्नागिरीत कुठलेही बिल्डर्स करत नाहीत. या सोहळ्यासाठी मा. श्री. संतोष सावंदेसाई ( निवृत्त उपमहाप्रबंधक बँक ऑफ इंडिया ), मा. सौ. स्मितल पावसकर ( माजी नगरसेविका ) आणि मा. श्री. निमेश नायर ( माजी नगरसेवक ) यांची प्रमुख उपस्तिथी लाभली.
हस्तांतरण सोहळा करण्यामागे त्या वास्तु मध्ये रहायला येणाऱ्या ग्राहकांचा एकमेकांशी परिचय व्हावा , त्यांच्यामध्ये एक उत्तम स्नेहबंध तयार व्हावा हा एक साधा विचार असतो . हस्तांतरण सोहळ्याचे स्वरूप एक फॅमिली गेट टुगेदर असेच असते ,छान गप्पा गोष्टी संगीत आणि छोटेखानी स्नेह भोजन.
आम्ही आमचे ग्राहक हे आमच्या परिवाराचे सदस्यच समजतो म्हणूनच त्यांची वास्तु त्यांच्या ताब्यात देताना एक पारिवारिक आनंद सोहळा या हस्तांतरणाच्या निमित्ताने आम्ही साजरा करतो.
आमच्या अशाच “नलावडे संकुल” या गृह प्रकल्पाच्या आनंद सोहळ्याची काही क्षणचित्रे.