TESTIMONIALS


प्रिय संतोष,

काल काही कारणामुळे लवकर जावे लागले त्याबद्दल क्षमस्व.

नेहमी प्रमाणे नवीन संकुलाच्या हस्तांतरण सोहळ्याला तू अगत्याने आमंत्रीत केलेस त्याबद्दल धन्यवाद.

स्वराज्य” संकुल पूर्ण होऊन त्याचे हस्तांतरण पार पडले त्याबद्दल तुझे आणि संपूर्ण ‘कौमुदी’ टीम चे खूप खूप अभिनंदन.

काल तू आपल्या भाषणात सांगितलेस कि जेंव्हा हा प्रकल्प सुरू केला तेंव्हा काही समव्यावसायिक म्हणत होते की हा संपला. मी जेंव्हा प्रथम त्या साईट वर गेलो तेंव्हा फूटींग चे काँक्रीट चालू होते, ते सर्व बघून तू संपलास असे तरी वाटले नाही. तरी हा प्रकल्प खडतर आणि सर्व प्रकारच्या कसोट्या बघणारा आहे हे मनोमन जाणवल आणि मी स्वतालाच म्हटले “आयला हा यातून कधी बाहेर येणार देव जाणे ”

शिवाजी महाराजांनी सहयाद्रीच्या दरी खोऱ्यातून स्वराज्य निर्माण केले आणि तुझी प्रकल्पाची जागा म्हणजे दरीच होती. वर आल्यावर निसर्गरम्य देखावा दिसणार हे माहीत होते तरी ते वर येणेच महत्वाचे होते. दोन पार्किंग स्लॅब, हेवी स्ट्रक्चर, साईट डेव्हल्पमेंटचे प्रचंड खर्चिक काम हे सर्व पार पडल्यावर वर यायला होणार होते.

आणि मग आली नोटबंदी आणि त्या मागोमाग बांधकाम क्षेत्रातही मंदी, भराभर वाढणारे रेट एकदम थांबले किंवा कमी सुद्धा झाले, हा पहिला धक्का

हा धक्का पचवून उभे रहावे तर कोरोना चा दुसरा धक्का त्या बरोबरच स्टील चे वाढलेले दर, वाळू चे वाढलेले दर अशी एकामागून एक धक्क्यांची मालिकाच सुरु झाली.

सर्व अंदाज आणि आडाखे अक्षरशः कोलमडवून टाकणारी परिस्थिती. आमच्या सारखा यात पार धुळीला मिळाला असता पण तुझ्या आत असणाऱ्या नैसर्गिक धिरोदात्त पणे तू ठाम उभा राहिलास.

या सर्व कालावधित रेरा आणि रेडी पझेशनचा ट्रेंड आला असताना बांधकाम चालु ठेवण्यासाठी तू भांडवल उभे करण्यासाठी तू काय काय केले असशील ते तुझे तुलाच माहीत. पण या सर्व संकटांवर मात करून आज “स्वराज्य” साकार झाले आहे. आणि आणखी एक ड्रॉ बॅक म्हणजे हे पूर्णपणे निवासी संकुल असल्यामुळे यात कमर्शिअल फायदा सुद्धा नव्हता (हाँरबल) पण तरीही हे पूर्ण झाले. आणि नुसते पूर्ण झाले नाही तर बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता पूर्ण झाले.

काल झालेल्या सोहळ्यातून हे समजले की ‘स्वराज्य ‘मधे घर असणे हे आता प्रेस्टीज आणि स्टेटस सिंबॉल झाले आहे. आम्ही स्वराज्य मधे राहतो असे सांगणाऱ्या माणसांचे एक वेगळे स्टेटस इथून पुढे असणार आहे.
हॅटस् ऑफ टू यू . !

हा प्रकल्प तुला बरच काही शिकवून गेला असेल आणि त्याच बरोबर कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा तुझा स्वभाव आणखी कणखर करून गेला असेल यात शंका नाही. आता तू कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहेस याची खात्री पटली.

तुम्ही सर्व कुटुंबीय एक आहात आणि ही देखील एक मोठी ताकद आहे. या सर्व कालावधीत तू न बोलता आम्हाला बरच काही शिकवून गेलास त्याबद्दल धन्यवाद.

‘स्वराज्य’ सारखा ठिकाणी सुमारे १00 फ्लैटस बांधून विकणे हेच एक प्रचंड काम आहे. तुझे जितके अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.

परमेश्वर तुला आणि सर्व कुटुंबियाना, सर्व टीमला सुखात, आनंदात, आणि समृद्धीत ठेवो हिच सदिच्छा

आपला,
भूषण टिकेकर

भूषण टिकेकर

सुंदर प्रोजेक्ट, सुंदर नियोजन, आनंद वाटला

 

श्री. नीलकंठ व. बाईत
Swarajya, Flat No. 211

कार्यक्रमाची सुंदर नियोजन चैतन्यपूर्ण  वातावरण, उत्तम सादरीकरण, आनंद वाटला.

 

Abhijeet Mukadam
Swarajya, Flat No. 006

प्रथमतः संतोष तावडे याना हार्दिक अभिनंदन स्वराज्य हि खूपच सुंदर आणि चांगल्या लोकेशन साठी प्रसिद्ध झाली आहे. कौमुदी  च्या सर्व स्टाफना मनापासून अभिनंदन. सर्व स्टाफ loving and caring  आहे. धन्यवाद

 

Sudesh Kadam
Swarajya, Flat No. 416

आम्ही रत्नागिरी शहरात घर घेण्यासाठी अनेक जागा पहिल्या आणि स्वराज्य सोसायटी आमच्या पाहण्यात आली. आम्ही सोसायटीत शिरलो आणि घर बुक करूनच बाहेर पडलो. या सदनिकेचे एक वैशिष्ट्य आहे कि याचे पँप्लेट खूप छान आहे असे नाही तर बांधलेली इमारतही खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर नेत्र दिपक आणि मन उल्हासित  करणारा आहे. सोसायटीचे inauguration function करणारी स्वराज्य / Kaumudi ही एकमेव आहे. आणि आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो. आमच्या सहित या सोसायटीत राहण्याऱ्या सर्वांना सुख, समृद्धी आणि हेल्दी आयुष्य लाभो हि ईशवर चरणी प्रार्थना.

 

Shri Arvind Daphale, Smt Anuradha Daphale
Swarajya, Flat No. 107

रत्नागिरी मध्ये दोन महिन्यापूर्वी मी फ्लॅट घेण्यासाठी या परिसरात आल्यानंतर जेव्हा तावडेची हि वास्तु पहिली तेव्हाच ठरविले की आपल्या स्वप्नातले घर जे फार दिवस पासून मनात आहे ते इथेच आहे. आज रहायला येवून आठ दिवस झाले तर मी स्वप्नातल्या जगात रहात असण्याचे मला जाणवले.  फ्लॅट बाहेरील परिसर जितका सुंदर आहे तितकेच आतील वास्तुरचना फार विचार पूर्वक केलेली मला अनुभवाला आली. टेरेस वरून दिसणारे  नयनरम्य भगवती किल्ला दर्शन, मांडवी, भाट्ये बीच एकाच जागे वरून पहाण्याचे ठिकाणी माझा फ्लॅट आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

“तावडेना यासाठी मानाचा मुजरा”

 

Mr. Anand K. Malgundkar, Mrs. Megha A. Malgundkar
Swarajya, Flat No. 007

प्रथमतः संतोष तावडे (बिल्डर) या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

या स्वराज्यामध्ये येऊन आम्ही आमचे स्वप्नातले घर सत्यात उतरवताना खूप आनंद होत आहे. कौमुदीच्या सर्व स्टाफला पण शुभेच्छा देतो. संतोष तावडे मध्ये जो खरा माणूस दडलेला त्यांच्या प्रेरणेतून मला येथे एक प्रकारची ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे या निसर्गम्य अशा परिसरात आम्हांला एक चांगले घर मिळाले त्यासाठी आम्ही मोहिते परिवार आपली कृतज्ञता वयक्त करीत आहोत. अशीच आपली मेत्री कायम राहो हीच सदिच्छा.

 

Mr. Mohite Nitin Y., Mrs. Mohite Smruti N.
Swarajya, Flat No. 318

“ रत्नागिरी सारख्या निसर्गसंपन्न आणि शांत-सुंदर शहरात स्वराज्य गृहनिर्माण प्रकल्प सादर झाला आहे. हे रत्नागिरीचे भग्य आहे. सुंदर आणि डौलदार  इमारतीने शहराचे सौन्दर्य वाढते स्वराज्य प्रकल्प याला अपवाद नाही ‘कौमुदी बिल्डर आणि  डेव्हलपर्स ‘ चे सर्वेसर्वा मा. संतोषजी तावडे साहेब यांनी हा प्रकल्प आकारास नेताना दर्जा आणि कलात्मकता यामध्ये जराही काटकसर केलेली नाहि. थिबा पॅलेस परिसरातील  आणि जिल्हाधिकारी निवास स्थान, टी.व्ही सेंटर सारख्या महत्त्वाच्या भागातील ‘स्वराज्य’ गृहनिर्माण प्रकल्पामुळे सौन्दर्य अधीकच खुलले आहे. एक सुंदर, दर्जेदार आणि ऊबदार गृहप्रकल्प साकारून श्री तावडे साहेब यांनी अस्मरणीय कार्य केले. ते निश्तिच चिरस्थायी ठरेल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक  आणि धन्यवाद !

 

श्री शंकर मा. जाधव, सौ. विजया शं. जाधव
Swarajya, Flat No. 316

स्वर्गाहून हि सुंदर काही असेल याची प्रचिती म्हणजे श्री संतोष तावडे यांनी उभारलेला स्वराज्य प्रकल्प. खरंच खूप सुंदर. मी माझी फॅमिली खूप आनंदी आहोत . माझ्यासारख्या अनेक स्वाने तावडे सिरानी पूर्ण करावीत या करीता माझ्या कुटुंबाकडून तावडे सर याना खूप शुभेच्छा

 

Mr. Sondip Mahadev Tambekar
Swarajya, Flat No. 306

‘स्वराज्य’ कौमुदी हा खूप छान प्रकल्प आहे. आमचं स्वप्नातलं घर या प्रकल्पाच्या साहाय्याने होत आहे. या प्रकल्पाला खूप शुभेच्छा.

 

Mrs. Rupali Abhishek Phadke
Swarajya, Flat No. 202

आज रोजी स्वराज्य च्या आनंद सोहळा अविस्मरणीय असा होता नेहमीच आमच्या आठवणीत राहील.  Excellent

 

श्री. अशोक शंकर वळांबे
Swarajya, Flat No. 204

मला स्वराज्य ही वास्तू खूप आवडली. प्रशस्त , शांत हवेशीर आसून प्रसन्न वाटते आपणास Best of luck god bless you also.

 

सो. जयश्री अशोक कुलकर्णी
Swarajya, Flat No. 204

We all family members and also extended family of swarajya together enjoyed the program. Best wishes to Kaumudi Builders for their future plans & thanks for making our dream true of viewing the sea from our sweet home.

 

Dr. Arun Rathodkar
Swarajya, Flat No. 403

स्वप्नातले घराचे स्वप्न वास्तवात आले. मुख्य म्हणजे बिल्डर व ग्राहक हा जो आतापर्येंतचा अनुभव आला होता त्यापेक्षा येथे खुपच चांगल्या नात्याचा अनुभव आला. आपल्या पुढच्या वाटचालिसाठी खुप खुप शुभेछा.

 

Mrs. Shraddha Shriram Nawathe
Swarajya, Flat No. 105

My dream home provided by Kaumudi Builders & Developers. Thank you so much to them for their precious co-operation & very nice program arrangement.
Thanks for everything

 

Mrs Shruti J. Jadhav
Swarajya, Flat No. 415

Amazing construction like a flower. We all family enjoyed this construction & this inauguration function also.

Thanks, Kaumudi Construction

 

Vijendra Vishnu Kadam
Swarajya, Flat No. 410

Amazing no worry. Thank you no any worry thanks again

 

Mrs. Komal Pramod Salunke
Swarajya, Flat No. 512

A very beautiful nature surrounded environment. A scenic and serene evening.

 

Nitya Ashish Navare
Swarajya, Flat No. 501

“I have purchased a flat in Swarajya Project. This project is really very appreciable in all manners. Construction quality is very good. The surrounding premises is very soon to live there. Did not get any obstacles during paperwork also, all staff is very nice in behavior. Happy to be part of “Swarajya” Thank You.”

 

Mr. Amey Adinath Kothavale
Swarajya

“ रत्नागिरी शहरामध्ये आम्ही जेव्हा फ्लॅट घेण्याचा विचार केला, तेव्हा स्वराज्य या प्रकल्पाबाबत माहिती मिळाली. जेव्हा आम्ही साईटवर भेट दिली व श्री. तावडे सरांशी बोललो तेव्हा फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. फ्लॅटला दिलेल्या सुविधा फारच उत्तम असून, आम्ही कौमुदी बिल्डर्सचे खूप खूप आभारी आहोत! ”

 

Mr. Yogesh Dattaram Narvekar
Swarajya, Flat No. 110

“I would like to say very much Thankful to Mr. Santosh Tawade for giving us a dream home with a sea view. Also, I would like to put my opinion here, especially about the very kind nature of not only Mr. Santosh Tawade but also all their employee related to this project. Also, his construction style is very impressive. His overall view of all customers is very grateful. So the name ‘Swarajya’ is suitable for that. Thanks.”

 

Mr. Prasad Suryakant Surve
Swarajya, Flat No. 218

“Hi, I am Promod Salunkhe. Working in a Finolex Ind. Ltd.,So I was looking flat in Ratnagiri since last 6 years. After that I visit to “Swarajya” “Kaumudi Builders” Santosh D. Tawade. I feel in my life. I saw a first-time. Apartment, Garden, Separate car parking, function hall & all. that time I book this flat. Not only, I am satisfiy It’s Good all, my company member (Finolex) appreciate me. Thank you so much.”

 

Mr. Pramod Sudhakar Salunkhe
Swarajya, Flat No. 512

“आम्ही रत्नागिरीत १ बी एच के फ्लॅट घेण्याचा विचार केला. खूप site visit केल्या. पण श्री. संतोष तावडे यांचे काम बघितल्यावर तिकडेच flat घेण्याचा निर्णय घेतला. त त्यांचा बांधकामाचा दर्जा अप्रतिम आहे. service उत्कृष्ट आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आम्ही इतकी सुंदर वास्तू आम्हाला मिळाल्या बद्दल श्री. तावडे यांचे खूप आभारी आहोत.”

 

Mr. Mahesh A. Bhadekar
Swarajya, Flat No. 307

“Dear Santosh Tawade Sir,

Thank You Very Much for handing over my dream flat 213 in Ratnagiri ,I would like to share few words as below:

1) The name of project – SWARAJYA with historical font – I loved it .

2) The architecture of project – looks like palace.

3) Iconic view of scenic beaches from project site .

4) Well known and trustworthy builder “Kaumudi Builders & Developers”

5) Prime Location of site which is heart of Ratnagiri is most plus point for this project

6) Connectivity from site to most of schools, colleges, Veg/Fish market, hospitals, stadium, theater, restaurants, temples, historical places, tourist spots, Railway station, public transport connectivity and airport .

7) Received on time possession of my flat as per commitment even through Covid challenges

8) Received regular project status updates

9) The quality of construction work is excellent

10) All equipments in flat are branded and quality fittings

11) Value For Money

12) Experienced full transparency in payments from first booking till handover of flat.

13) Reserved and covered parking as per my choice makes me happier .

14) Redundant lift with battery backup

15) Landscape garden with beautiful lighting gives stunning views

16) Fully Satisfied with what told and what we received .

17) I rate 10 out of 10 for this project and my flat.

 

Big Thank You !!!

I would also like to Thanks Bharati ,Ghanekar ,Gurudas and Navale for their efforts”

Suresh Kamble
Swarajya, Flat No. 213

“My experience with swarajya is very good. also all the paper work done systemically & all the commitments made are accomplished with all the amenities per plan. Thank you Tawade Sir ”

 

Mrs. Adnya Rohan Pawar
Swarajya, Flat No. 418

“मी स्वराज्य येथे फ्लॅट बुक केल्या नंतर त्यांच्या सर्व्हिस बद्दल खुप समाधानी आणि संतुष्ट आहे . बिल्डिंग construction quality खुप उत्तम आहे .”

 

Rushil N. Redij
Swarajya, Flat No. 412

“रत्नागिरी सारख्या समृद्ध शहरामध्ये आपला स्वतःचा घर असाव अस असलेले स्वप्न “स्वराज्य ” या प्रकल्पाद्वारे साकार होताना
अत्यानंद होत आहे. स्वराज्य सभोवतालचा मनमुराद आनंद देणारा असल्यामुळेच याची प्रथम निवड मी केली.
श्री तावडे साहेब व त्यांचा सहकारी स्टाफ यांच्या सहकार्यामुळेच हे साध्य झाले .
सर्वांचे मन: पूर्वक आभार !”

 

श्री. जाधव महेश रामचंद्र
Swarajya, Flat No. 115

“We were looking for a flat in Ratnagiri and this was the first complex that we saw and liked it instantly. The builder recommended a perfect flat for us based on our requirements. They were very responsive to all our questions & needs during and post possession. They also helped us with some structural changes that we wanted to suit our needs. Overall it was a pleasant experience dealing with kaumudi builders and are happy with the completed flat.”

Anupam Dighe
Swarajya, Flat No. 514

We purchased a flat in swarajya the project of kaumudi builders. their’s project is very good & area wise it’s a good location & all the staff are helpful & cooperative. we loved the purchase at this site. Thank you

Rekha V. Mahadik
Swarajya, Flat No. 212

श्री संतोष तावडे, कामाचा दर्जा उत्तम तसेच ग्राहकाचे माणूसकीतून हित जपणारे बिल्डर म्हणून ऐकलं होत म्हणून स्वराज्य प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला आणि वरील गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या, त्या सत्यच आहेत. श्री तावडे यांच स्वतःच तांत्रिक ज्ञानही उत्तम असल्याचं जाणवल.
स्वराज्य हि इमारत प्रशस्त व सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी आहे. विशेषतः पार्किंग सुविधा अतिशय उत्तम आहे. कौमुदी बिल्डर्स यांचे इतर कर्मचारी वर्ग ही मनमिळावू व सहकार्याला अतिशय तत्पर व चांगला अनुभवला विशेषतः श्री घाणेकर गुरुदास नवेले व इतर ऑफिस मधील महिला वर्ग.
वरील प्रमाणे मी स्वतः पूर्ण समाधानी असून कौमुदी बिल्डर्स यांना धन्यवाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व दोन शब्द संपवतो – जय हिंद.

श्री. महेश प्रभाकर वाघाटे
Swarajya, Flat No. 112

Kaumudi Builders चा स्वराज्य हा प्रोजेक्ट मला खूपच आवडला कारण तिथले बांधकाम, आजु बाजुचा परीसर आणि location तसेच तावडे साहेब आणि office चा स्टाफ co-operative आणि supportive आहे. मला फ्लॅट विकत घेतल्या पासुन कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही.
Thank you.

प्रशांत जयवंत भारळी
Swarajya, Flat No. 214

रत्नागिरीत फ्लॅट शोधत असताना स्वराज्य सोसायटी प्रथम दर्शनीय आवडली. त्या प्रमाणे 1 BHK फ्लॅट बूक केला. श्री संतोष तावडे साहेब यांच्या सकट संपूर्ण स्टाफ खूपच co-operative आहे. आज आम्ही फ्लॅटचा ताबा घेतला.
धन्यवाद!

अरविंद गो. डाफळे
Swarajya, Flat No. 107

मी स्वराज्य सोसायटी मध्ये 1 BHK फ्लॅट possession घेतला आहे. कौमुदी बिल्डर्सचे बांधकाम खूप ऊत्तम आहे आणि त्यांनी परिसर खूप छान पद्धतीने डेव्हलप केला आहे. एकंदरीत वास्तू व अवती भवतीचा परिसर हा रत्नागिरीत रहाण्यास अतिउत्तम आहे.

यशदिप अविनाश देसाई
Swarajya, Flat No. 207

“Loved the purchased Flat No. 108 in Swarajya. This is my first experience with Kaumudi Builders and Developers. They have given a very good and prompt service. The staff of kaumudi builders is also very polite and helpful. Mr. Tawade and the team is always committed with good quality of work. All the process related to the purchase of flat went smooth and excellent. Thanks to Kaumudi Builders and team!”

 

 

Varsha Narote
Swarajya

स्वराज्य प्रोजेक्ट मधील फ्लॅट म्हणजे खरंच स्वप्नपुर्ती”

फ्लॅट खरेदी करण्याचा मनात विचार सुरु होता. कारण घर खरेदी करणे किंवा जागा घेऊन घर बांधणे हे आताच्या महागाईमध्ये शक्य होणार नाही हे तितकच सत्य होते, ‘पण फ्लॅट खरेदी करताना तो फक्त चार भिंतींचा ठोकळा नसावा’, त्या फ्लॅटमध्ये देखिल आपले स्वतःचे घर हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी अपेक्षा होती. एक दिवस असाच ऑफिसमध्ये बसलो होतो त्यावेळी माझे मित्र श्री. नलावडे हे ऑफिसमध्ये आले. काय साहेब काय विचार करताय असे विचारले, त्यांना मी माझ्या मनातील इच्छा बोलून दाखविली त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी श्री. तावडे साहेबांच्या स्वराज्य प्रोजेक्ट बाबत मला सांगितले. या प्रोजेक्ट बाबत मी व माझ्या पत्नीनेही फेसबुकला जाहिरात पाहिली होती, पण त्यांचे प्रोजेक्ट इतके मोठे, सुंदर, दर्जेदार असतात की तिथे आपल्याला फ्लॅट घेणे परवडणार नाही असे वाटत होते. त्यामुळे त्याचा कधीही विचार केला नव्हता पण शोवटी श्री. नलावडे यांचे आग्रहाखातर मी श्री. तावडे साहेबांच्या स्वराज्य प्रोजेक्टला भेट दिली आणि बघताचक्षणी त्यांची संकल्पना आणि इमारतीचे बांधकाम मनात भरले. आणि न शक्य होणारे स्वप्न सत्यात उतरले ते फक्त आणि फक्त तावडे साहेबांचे स्वभावामुळेच, त्यांचा वागणुकीतील दिलदारपणा आणि कामातील दर्जेदारपणामुळे ते खरच Great आहेत. बऱ्याचवेळा फ्लॅट घेतला की आपला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याबाबत शंका निर्माण होतात पण श्री. संतोष तावडे यांच्या स्वराज्य प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट घेतल्यानंतर मला असे कधीही वाटले नाही. श्री. तावडे साहेबांना त्यांच्या स्वराज्य प्रोजेक्टसाठी अनेक शुभेच्छा. तसेच त्यांनी यापुढेही असेच दर्जेदार प्रोजेक्ट निर्माण करावेत व अनेक लोकांची स्वप्ने पूर्ण करावीत अशा शुभेच्छा.

Mr. Sandip Mahadev Tambekar
Swarajya

I am very happy to write here that,”Indradhanu” is just not an apartment, it is heaven. Because comparing to other builders The capacity of construction of Nirman Infrastructure & Realtors is Excellent.Finishing of Interiors Parts, and main entrance lobby is attractive. Your well arranged parking area is the highlight of this project. Planning of each flat is most comfortable to each flat owner.

We are very much satisfied with having a flat in Indradhanu.

Thank You.

Mr. Rajeevan C. Nambiar ,Mrs. Beena R. Nambiar
Indradhanu


ज्यावेळी ह्या बांधकामाची आखणीही झाली नव्हती त्यावेळी मी तावडे सर यांच्याशी संपर्क साधून आम्ही बुकिंग केले . बुकिंग केल्यानंतर एवढी रक्कम उभी करणे अशक्य वाटत होते. पण बँक कर्मचारी मि. साखळकर सर यांची भेट घालून देऊन तो ब्लॉक संपूर्ण ताब्यात येईपर्यंत सर्व सहकार्य श्री. संतोष तावडे सर यांनी केले. मध्यंतरी मला आलेली पैश्याची अडचण देखील त्यांनी भागवली ही गोष्ट मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यांचे कर्मचारी श्री राजीवन सर , सौ चव्हाण मॅडम यांनी तर खूपच सहकार्य केले.
इमारत तर खूप देखणी बांधली, प्रत्येकाला आवडेल अशी. बांधकाम उत्तम दर्जाचे आहे आतील फॅन्स , लाईट , नळ इ. उत्कृष्ट आहेत.

श्री सुधीर पांडुरंग बिर्जे, सौ.स्वागता सुधीर बिर्जे
Indradhanu


“कणाद क्लासेस ” चे “इंद्रधनू ” मधील वर्ग आमच्यासाठी खास व गौरवाची बाब आहे. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर ची इंद्रधनू ही अतिशय सुरेख वास्तू आहे .
ऑफिसेस साठी प्रशस्त दालने , सुंदर सदनिका यांनी ही इमारत छानच सजली आहे .
इमारतीच्या आतील मार्गिका ,जिने,लिफ्ट्स ,बाहेरील पॅसेजेस ,पार्किंग्स ,सुलभतेने फिरण्यासाठी मोकळ्या जागा सर्व प्रशस्त व हवेशीर आहे.
प्रवेश करतानाच मन प्रसन्न करणारी वास्तू ,निर्माणची तत्पर, नेटकी व सौजन्यपूर्ण सोसायटी आपले वास्तव्य सुखावह करते.
उच्च दर्जाचे बांधकाम ,सोयी आणि सुंदर वास्तूरचना यांचे “निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर” हे रत्नागिरीतील जनक आहेत असे मी म्हणेन.

अक्षता इंदुलकर
Indradhanu

“आज दि. २७ जून रोजी आम्हाला ह्या नवीन घरात येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष पूर्ण झालाय हे खरंच वाटत नाहीये एवढा आनंद ह्या गेल्या एका वर्षात आम्हाला मिळालाय. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंद्रधनू मधील आमचं घर म्हणजे आधुनिकतेला साजेसच. इमारतीच्या आकर्हाक रंगसंगतीबरोबर स्वतःचे गार्डन, लॉन, पार्किंग, लिफ्ट, सोलर  सिस्टिम आणि बराच काही… या सर्वांसोबत घराची अंतर्गत रचना सुद्धा खूपच छान आहे. कि हॉल आणि त्याला लावून असलेली बाल्कनी , खरा सांगायचं तर आमचा बराचसा वेळ इथेच जातो. रोजची प्रसन्न सकाळ आणि सूर्योदय अगदी स्वप्नात पाहतो तसं किंवा सनसेट पाहतो तसं आम्ही रोज पाहतो. त्याशिवाय सर्व सुखसोयींनी युक्त किचन… स्वयंपाक करताना अगदी सोपा, वावरायला मोकळी जागा,,, उत्तम view असलेली bedroom. खरा सांगायचं तर “इंद्रधनू” मध्ये आल्यापासून आमचे आयुष्य पण सप्त झालं आहे.
आणि याचं खरा श्रेय जातं ते श्री. तावडे सर याना! “मी तुम्हाला घर देईन” हे उदगार त्यांनी खरे केले. खूप खूप मनापासून धन्यवाद!! देव त्यांना उदंड आयुष्य देवो … 

 

श्री. रामभाऊ साळवी, फ्लॅट नंबर : ३१४
Indradhanu

“घर ..आपल्या हक्काचं असावं असं सगळ्यांना वाटत त्यातलाच मी एक. गेले १.५ वर्ष यासाठी फिरत होतो पण काही मनासारखं घडत नव्हतं. काही ठिकाणी लोकेशन छान होत पण बजेट नव्हतं, काही ठिकाणी लोकेशन बांधकाम जमून आलं पण पाण्यासाठी सुविधा नीटनेटकी नव्हती. या सगळ्यात एक दिवस संध्याकाळी एक संदर्भ आला कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा एक प्रोजेक्ट चालू आहे तू लोकेशन बघायला ये. मी ते लोकेशन  बघता प्रत्यक्ष कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या ऑफिस ला पोहोचलो. तिथे गेल्यावर कौमुदी बिल्डर्स चे सर्वेसर्वा श्री संतोष दिलीप तावडे यांच्याशी भेट झाली आणि प्रोजेक्ट विषयी कोण माहिती देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली. अन तिथेच एक वेगळी गोष्ट लक्षात आली कि संपूर्ण प्रोजेक्टची माहिती दस्तुरखुद्द श्री संतोष दि. तावडे यांनीच दिली. कारण ते स्वतः आम्हाला हे सगळं समजावून सांगतील हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. या सगळ्यात त्या मीटिंग नंतर आमचं लोकेशन पाहायचं निश्चित झालं. त्यापुढील सर्व गोष्टी मनाप्रमाणे झाल्या. आणि स्वप्नातलं घर प्रत्यक्षात आले ते कुवारबाव येथील ओम विहार संकुल मधील अनुराधा बिल्डिंग मध्ये. अजून चौकशी अंती असं कळलं कि कौमुदीचे सर्व प्रोजेक्ट हे मोक्याच्या जागी आहेत आणि सर्वात महत्वाचे सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात आहे. त्याच बरोबर ओला कचरा व सुका कचरा यांची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था केली जाते. उत्कृष्ट बांधकाम तर कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे बलस्थान याविषयी आपण काही न बोललेलं बरं प्रत्येक बिल्डिंग च्या सभोवताली सोडलेली प्रशस्त जागा, तयार केले सुंदर बाग, बिल्डिंमधील कॉरिडॉर हा जणू एखाद्या हॉटेल सारखा भासते. आमच्या बिल्डिंगचे काम सुरु असताना आम्ही साईट वर यायचो आणि काही काही बारीक बदल सुचवायचे असल्यास कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सुपरवाईजर हसतमुखत आणि मुद्देसूद ऐकून घायचे. त्यात बरोबर आमच्याकडे येणार आमला मित्र परिवार आणि नातेवाईक आप्तेष्ट आम्ही घेतलेलं घर पाहून आणि सभोवतालचा परिवार पाहून प्रत्येकजन आम्ही मुबंईत आलो आहेत अशी प्रतिक्रिया देतात. त्यामुळे माझा उर अभिमानाने भरून येतो आणि अशी भावना मनात निर्माण होते कि खरंच आपण आपलं हक्काचं घर तर घेतलंच पण ते सर्वाथाने परिपूर्ण असच आहे. या सर्व गोष्टींचं श्रेय जात कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपूर्ण अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि टेकनिकल टीमला. अजून एक सांगायचं राहिलं आठवलं म्हणून सांगतो कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा प्रत्येक प्रोजेक्ट हा काळानुसार अपडेटेड असतो. अशाच भविष्यातील अपडेटेड प्रोजेक्टसना मी खूप शुभेच्छा देतो आणि असच माझ्यासारख्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात उतरविण्याच काम कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची टीम करेल अशी आशा बाळगतो. थँक यू”

Mr. and Mrs. Bhagvat
Mr. Amit Bhagwat
– Om Vihar Sankul Anuradha

“We looked for Quality – It was there. We looked for good location it was there. We looked for value of money –it was there. Today we feel proud that we made the right move in booking an apartment in Om Arcade.”

Mr. Ajit Atmaram Desai
– OM Arcade

“रत्नागिरी शहरामध्ये दुसरे घर शोधण्याच्या मी तयारीत होतो. दुसरं घर घ्यायचे म्हटल्यावर सुसज्ज ,छान ,प्रशस्त घर शोधायचे होतं .परंतु ते निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात श्री. संतोष तावडे यांच्या कन्स्ट्रक्शन मधील हवं असा माझ्या मिसेस चा हट्ट होता. माझ्या मिसेसने तावडे सर याना तुमचे जेथे मोठे नवीन कन्स्ट्रक्शन होईल तिथे आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे असं सांगितले . त्याप्रमाणे श्री. तावडे सर यांनी आम्हाला कर्लेकर वाडी येथे City Pride नावाने कन्स्ट्रक्शन सुरु होणार आहे परंतु अजून वेळ आहे असे सांगितले . परंतु आम्ही सरांना सांगितले की कधीही कामाला सुरुवात करा पण आम्हाला येथेच फ्लॅट हवा आहे. सुरुवातीला कोणताही Approval Plan नसताना आम्ही इंद्रधनू मध्ये फ्लॅट बुक केला . अगदी हवा तास, हव्या त्या लोकेशन ला आम्हाला इंद्रधनू मध्ये फ्लॅट मिळाला. फ्लॅट बुक केल्यानंतर श्री. राजीवन सर ,श्री विजय धनावडे यांचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले. प्रत्येक गोष्ट मनासारखी करून मिळाली. त्याबद्दल श्री तावडे सर व सर्व निर्माण इन्फ्राचे पार्टनर यांचा मी खरेच खूप आभारी आहे. छान , मनमोहक ,प्रशस्त इमारत निर्माण इन्फ्राकडून इंद्रधनूच्या रूपाने साकारलेली आहे.
श्री तावडे सर व निर्माण इन्फ्राचे सर्व पार्टनर, सर्व कर्मचारी याना मनपूर्वक शुभेच्छा

 

श्री संतोष शामरा कांबळे, सौ. जयश्री संतोष कांबळे, फ्लॅट नं २१६
Indradhanu

“रत्नागिरीतील कायमस्वरूपी वास्तव्यासाठी मी फ्लॅट खरेदी करण्याच्या विचारात होतो. माझा व्यायवसाय मारुती मंदिर येथे असल्यामुळे मला आसपासच्या परिसरात फ्लॅट हवा होता, म्हणून सहज फिरताना इंद्रधनू अपार्टमेंटचा बॅनर नजरेत पडला. यापूर्वी स्वतःचा फ्लॅट रत्नागिरीत असल्यामुळे फार घाई नव्हती. थोड्याच दिवसात रत्नागिरी मध्ये क्रेडाई मार्फत गृहनिर्माण स्टॉल लावण्यात आले होते. तिथे फिरताना इंद्रधनू अपार्टमेंटचे पार्टनर श्री कट्टे यांच्याशी माझी या माझ्या पत्नीची प्राथमिक बोलणी झाली. कट्टे यांनी अतिशय प्रभावी केलेल्या काउंसेलिंग मुले माझा इंद्रधनू अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार पक्का झाला. माझी गरज २ बीएचके ची होती परंतु इंद्रधनू अपार्टमेंट ची जागा या सर्व सुविधा पाहिल्यानंतर ३ बीएचके असावा असे वाटले. कन्स्ट्रक्शन चालू असतानाच बुकिंग करत असल्यामुळे प्लॅन मध्ये थोडा बदल करून ३ बीएचके फ्लॅट अरेंज करून दिला. इंद्रधनू अपार्टमेंट चे उत्कृष्ट बांधकाम, मनमोहक गेट एंट्री, चिल्ड्रन प्ले एरिया, इंटर्नल पॅसेज, पार्किंग ची व्यवस्था या सर्वच गोष्टी अतिशय कल्पकतेने केलेल्या आहेत.
निर्माण इन्फ्रा चे पार्टनर श्री. संतोष तावडे यांचा मनमिळाऊ स्वभाव व व्यवसायातील उत्कृष्ट वास्तू निर्माण इन्फ्रा म्हणजे कोकणातील सहकारी भागीदारीचे उत्तम उदाहरण. 

श्री. संतोष कोलते, फ्लॅट नंबर : ४१२
Indradhanu

“कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रत्नागिरी शहराच्या बांधकाम विश्वातील एक आपुलकी आणि विश्वासाचं नाव याच कौमुदी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी आम्हाला आमचं हक्काचं घरकुल दिल. मजबूत बांधकाम, प्रशस्त आणि उत्तमरीत्या सुशोभित केलेला परिसर, उत्तम ड्रेनेज, गार्डन , मुबलक आणि चोवीस तास पाणी सुविधा मध्यमवर्गील कुटुंबाला परवडणारे दर घरांची रचना आणि महत्वाचे म्हणजे प्रदर्शन व्यवहार हि कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास वैशिट्ये. आमच्या अनुराधा इमारतीतील प्रत्येक सदनिकाधारक इथे आनंदाने आणि समाधानाने राहतो. कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणजे आमच्या रत्नागिरीतील घराला घरपण देणारी माणसे होय.
थँक यू”

Mr. Mahadev Akhade
Mr. Mahadev Babu Akhade
– Om Vihar Sankul Anuradha

“I would recommend Kaumudi Builders without hesitation to anyone that is looking for quality workmanship delivered within agreed timescales at a competitive price. I am Satisfied.”

Mr. Raju Ghag
Mr. Rajendra Madhusudan Ghag (Mumbai)
– OM Avenue

“I would definitely recommend Kaumudi Builders as they provided an excellent, value for money service.”

Mr. Shashi Mali
Mr. Shashikant Mali
– OM Avenue

“When my relative was thinking of buying a flat, He consulted with me. I did research on a few builders and chose Landmark Builders finally because of their market reputation Also their expertise through their completed projects helped to build our confidence levels.”

VidyaRewale
Mrs. Vidya Rewale
– OM Vihar-Vishakha

“कौमुदी बिल्डर्स आम्हाला निवासी तसेच व्यावसायिक जागा देतात जे इतरांपेक्षा भिन्न तसेच उत्कृष्ट असतात. अद्वितीय डिझाइन्स आणि दर्जेदार बांधकाम तेही परवडणाऱ्या किमतीत मिळणे हे शक्य असते फक्त कौमुदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोजेक्ट्स मध्येच!”

Mr. Santosh Ghanekar
Mr. Santosh Yashwant Ghanekar
– OM Vihar

“We are fully satisfied with services provided by Kaumudi Builders & Developers, and we are impressed regarding construction of the building organized by Kaumudi Builders. We are also satisfied with all staff.”

Mr. Ninad Shinde
Adv. Ninad Ganpat Shinde
– OM Avenue

“My search for a new home ended at Kaumudi Builders. I had some key requirements – reputed builder, good layout, fair Price, secure environment, light and ventilation. I have to say that I was more than satisfied in all respects with Kaumudi Builders.”

Mr. Shandip Dali
Mr. Sandip Sudhir Dali
– OM Plaza

“Like anyone I had these basic requirements when I have approached Kaumudi Builders for owning an apartment. Spacious interiors with essential amenities at good locations I am so glad now that I have got more than what I had been looking for and very satisfied with the quality of construction of Kaumudi Builders.”

Mr. Subhash Mahadev Gurav
– OM Vihar-Vishakha

“कौमुदी बिल्डर्स एक अत्यंत दर्जेदार निवासी बांधकाम कंपनी असून बहुतांश रहिवासी त्यांच्या बांधकाम कौशल्याचा फायदा घेण्यासाठी उभे आहेत. आतापर्यंत उत्कृष्ट बांधकाम देऊन त्यांनी असंख्य आनंदी परिवार उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. “

Mr. Milind Malgundkar
Mr. Milind Yashwant Malgundkar
– OM Arcade
color
https://kaumudibuilders.com/wp-content/themes/carbon/
https://kaumudibuilders.com/
#26ade4
style5
paged
Loading posts...
/home2/kaumu14g/public_html/
#
on
none
loading
#
Sort Gallery
on
yes
yes
off
Enter your email here
on
off